Grain distribution started smoothly due to removal of error in Aadhaar server
महाराष्ट्र

आधार सर्व्हरमधील त्रुटी दूर झाल्याने धान्य वितरण सुरळीत सुरू

मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत पात्र लाभार्थींची ई-पॉसद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तुंचे वितरण करण्यात येते. रास्तभाव दुकानातील ई-पॉस उपकरणांमध्ये मागच्या आठवड्यात आधार सर्व्हरमुळे तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे धान्य वितरण संथ गतीने होत होते. तथापि सदर तांत्रिक अडचण आता दूर झाली असून मागील 4 दिवसांपासून धान्य वितरण सुरळीत होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मागील 4 दिवसांमध्ये राज्यातील रास्तभाव दुकारातील ई-पॉसद्वारे 30.09 लक्ष व्यवहार झाले आहेत, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत