निलंगा : निलंगा येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले देवस्थान हजरत दादापीर दर्गा शरीफ यांच्या 410 व्या उर्स निमित्ताने आज कोरोनाच्या नियमांचे पालन करत चारचाकी वाहनातून सँदल (मिरवणूक)काढण्यात आली. त्यामध्ये विशेषतः दर्गा हजरत दादापीर चे सज्जादा नशीन सय्यद करीमउल्लाह नबीरा खादरी यांच्या अध्यक्षतेखाली लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड आणि निलंगा विधान सभेचे इच्छुक उमेदवार माजी पंचायत समिती सभापती अजितराव माने हे उर्सच्या संदल मिरवणुकीत विशेष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हजरत दादापीर दर्गा देवस्थान येथे डॉ. सुनील गायकवाड यांच्या सोबत पंचायत समितीचे माजी सभापती तथा निलंगा विधानसभाचे भावी आमदार अजित माने यांनी दर्शन घेतले. यावेळी अनेकजण उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित राहून खूप आनंद झाला, कोरोनाच्या नियमानुसार उर्स निमित्त यात्रा महोत्सव रद्द करून सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी करत आहेत.
मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना उदंड आरोग्य व निरोगी जीवन लाभावे यासाठी विशेष प्रार्थना करून हजरत दादापीर दर्गा शरीफ यांना साकडे घातले, असे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला प्रा दयानंद चोपणे, गणराज्यचे रामलिंग पटसाळगे, तसेच अनेक हिंदू मुस्लिम लोकांची उपस्थिती होती.




