Former Mumbai cop Param Bir Singh suspended
महाराष्ट्र मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अखेर निलंबित

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सरकारने गुरुवारी निलंबित केले. परमबीर आणि आणखी एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या डीजीपींना पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंह यांच्या निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अँटिलियाच्या बाहेर स्फोटके जप्त केल्यानंतर आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि सॅटेलाइट टाउनमध्ये अनेक एफआयआर दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक प्रदीप शर्मा आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.

डीजीपी संजय पांडे यांनी परमबीर सिंग प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनुकुमार श्रीवास्तव यांनी तो परत पाठवला होता, कारण त्यांना मुद्देसूद माहिती हवी होती. त्यानंतर सिंग आणि डीसीपी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. बऱ्याच दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यास मंजुरी दिली होती, परंतु मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत अंतिम आदेश जारी केले जातील, अशी माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत