Goods worth Rs 18 lakh 80 thousand including liquor seized from state excise department
महाराष्ट्र सोलापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मुंबई विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आढेगाव-तांबोळे रोडच्या उत्तरेस तपासणी केली असता, गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले एकूण ३०१ पेट्यांमध्ये परराज्यातील अवैध विदेशी दारू साठा करून त्याची विक्री करण्याचा उद्देश फरार आरोपीचा होता. या फरार आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर आरोपीविरुध्द महाराष्ट्र प्रोव्ही. अॅक्ट १९४९ चे कलम ६५ (ई), ८१, ८३ व ९० नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. गोवा राज्यात विक्रीस असलेले मद्यसाठ्यासह एकूण रु.१८,८०,२४०/- इतक्या किंमतीचा गुन्ह्याचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, विभागीय आयुक्त सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भरारी पथकाने ही कामगिरी केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत