पुणे : प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे आज (१० ऑगस्ट) निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक आहेत. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले होते.
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आयुर्वेद, योग व संगीतोपचार विषयांतील तज्ज्ञ बालाजी तांबे यांचे आयुर्वेदिक औषधी शास्त्र विषयातील संशोधनात मोलाचे योगदान राहिले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 10, 2021




