ठाणे : उल्हासनगर येथील नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोरील साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी ३ ते ४ व्यक्ती अडकल्या असल्याचा अंदाज असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
साई सिद्धी या इमारतीच्या पाचव्या मजल्यापासून ते पहिल्या मजल्यापर्यंतचा स्लॅब कोसळला आहे. ही घटना आज रात्री ९ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम रवाना झाली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.




