छत्तीसगड : छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे गुरुवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला. राजनांदगाव खैरागड मार्गावरील सिंगारपूर गावाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत कारने अचानक पेट घेतल्याने एकाच कुटुंबातील ५ जण जिवंत जळून खाक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालोद जिल्ह्यातील लग्न समारंभात सहभागी होऊन हे कुटुंब खैरागडला परतत होते. […]

