मुंबई : परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी मंचा’ची स्थापना करण्यात आली आहे. या कामासाठी समन्वयक / उपसमन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे आदेश राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनी काढले आहेत. […]

