मुंबई : राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुका राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मंगळवारी (२० डिसेंबर) मतमोजणी होणार आहे. […]

