मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे अशा दुर्घटनेत व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या वारसांना 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात […]

