मुंबई : महाराष्ट्राच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकासआघाडीमध्ये खटके उडताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असताना आता शिवसेनेच्या उबाठा गटाने पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, त्यांच्या ‘अतिआत्मविश्वासामुळे’ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कामगिरीला धक्का बसला आहे. मुंबईत […]