मुंबई : राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतीगृहे, शाळांमधील स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी. त्यासाठी विभागात गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करण्यात यावे. विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात (डिबीटीद्वारे)जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
टॅग: schools
स्कूल व्हॅन आणि बसमधून प्रवास करणाऱ्या मुलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी पुणे आरटीओने शाळांना दिले ‘हे’ निर्देश…
पुणे : ३० सप्टेंबर रोजी एका स्कूल व्हॅन चालकाकडून सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शाळांना शालेय वाहनांसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आवाहन केले आहे. याबरोबरच एक वेब पोर्टल सुरू केले आहे जेथे शाळा परिवहन समित्या अहवाल सादर करू शकतात. पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी […]
शाळांच्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था हे विद्यार्थिनींच्या सन्मानाच्या अधिकाराचे उल्लंघन, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा
मुंबई : शाळांच्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था हे विद्यार्थिनींच्या सन्मानाच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. काही सरकारी अनुदानित शाळांमधील स्वच्छतागृहांच्या देखभालीबाबत आणि स्वच्छतेच्या बाबतीत ही खेदजनक स्थिती म्हणजे मुलींच्या सन्मानाने जगण्याच्या मानवी हक्काचे उल्लंघन आहे, असा खेद मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केला. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांच्या खंडपीठाने […]
२ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करणार, शिक्षण विभागाने केले नियोजन
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीच्या शाळा एप्रिल महिन्यात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आता शिक्षण संचालनालयाने २०२२ ची उन्हाळी सुटी २ मेपासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. […]
महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बालेत होते. […]
पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार
पुणे : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शाळांसंबंधीची माहिती सोशल मिडीयाद्वारे दिली. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू […]
पहिली ते सातवीपर्यंत शाळा बंदच राहणार, शाळा सुरू करण्याच्या निर्णय लांबणीवर
पुणे : राज्य सरकारने राज्यात कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्यानुसार सर्व तयारी देखील सुरु होती. मात्र, दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन नावाचा नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर आता शाळा सुरू करण्याच्या निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. राज्य सरकारने सुरुवातीला १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता […]
पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर […]
राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती ॲपद्वारे नोंदविली जाणार
मुंबई : सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचे […]
पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून होणार सुरू
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार याबाबत उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून […]