Massive Fire at Ramesh Dyeing in Sadashiv Peth Pune – No Casualties
पुणे महाराष्ट्र

पुणे : सदाशिव पेठेतील रमेश डायिंग दुकानात भीषण आग,अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल

पुणे : सदाशिव पेठेतील रमेश डायिंग या दुकानात भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आग दुकानाच्या टेरेसपासून सुरू होऊन आतील भागातही पसरली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अहवालात नमूद आहे. […]