Permanent rehabilitation will be done in six months, Chief Minister's relief to the residents of Irshalwadi
महाराष्ट्र

सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार, इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

मुंबई : इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इरशाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यांत होईल, असा विश्वास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला! दिवसभरातील स्वातंत्र्य दिनानिमित्तचे कार्यक्रम आटोपून […]