पुणे : शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा मृतदेह त्याच्या वसतिगृहातील खोलीत आढळला. पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार ही घटना आत्महत्येची असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. मृत कॅडेटची ओळख अंतरिक्ष कुमार सिंग अशी पटली असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी होता. अंतरिक्ष हा माजी सैनिकाचा मुलगा असून एनडीएमधील चार्ली स्क्वॉड्रनचा पहिल्या टर्मचा […]

