नवी दिल्लीः कोरोनाची रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय उरल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. नागरिकांना कमीत कमी प्रवास करून, जनजागृती अभियान राबवून देशव्यापी पातळीवर नागरिकांचे घरीच जाऊन लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला होता. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे. […]

