कोरोनामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना अतिरिक्त संधी देण्यास यूपीएससी (UPSC) ने मान्यता दिली आहे. याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी त्या उमेदवारांना CSE-2021 मध्ये आणखी एक संधी देण्यात येणार आहे, ज्यांच्याकडे २०२० च्या परीक्षेची शेवटची संधी होती.
टॅग: Hearing
मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला सुनावणी
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी […]