मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.84 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि.12 ऑक्टोबर 2012 अनुसार 8.84 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 16 ऑक्टोबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. […]
टॅग: Government of Maharashtra
राज्यात ६६ हजार जणांना रोजगार मिळणार, आज झाले ‘हे’ काही महत्वाचे सामंजस्य करार
जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशातील २३ कंपन्यांनी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. आज झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, […]
मोठा निर्णय! तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रातील पहिला गृहप्रकल्प हाती; केवळ साडेसहा लाखात मिळेल घर
नागपूर : तृतीयपंथीयांनाही त्यांचे हक्क मिळायला हवेत. चांगले आयुष्य जगण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे. याच उद्देशाने नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रातील पहिला गृहप्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मौजा चिखली येथे २५२ घरकुले उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नऊ लाखांच्या घरांसाठी अनुदान मिळावे, यासाठी राज्यस्तरावर बैठक घेण्यात आली. यात ६ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान […]
जिंजी किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन ५० लाखाचा निधी देणार
मुंबई : जिंजी (तामिळनाडू) किल्यातील ज्या सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार आठ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाच्या कामांचे सनियंत्रण करणाऱ्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. […]




