नागपूर महाराष्ट्र

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

नागपूर : विधानसभेत नगरविकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या सन 2025-26 च्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या. विधानसभेत नगरविकास विभागाच्या सन 2025-26 या वर्षाच्या एकूण 9 हजार 195 कोटी 76 लाख 58 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

सोलापूरच्या कॉ. साने महिला गृहनिर्माण संस्थेला नोंदणी आणि मुद्रांक शुल्कात सवलत

मुंबई : सोलापुरातील कॉ. मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून मौजे कुंभारी येथील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बांधण्यात आलेल्या घरांच्या जागेवरील नोंदणी शुल्क आणि गृहनिर्माण संस्थेतील घरांवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सोलापुरातील कॉ. मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून मौजे कुंभारी […]

महाराष्ट्र मुंबई

यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्रीस मंजुरी

मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या ९९ एकर २७ आर जमीन विक्रीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. ही जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना उपबाजार आवाराकरीता खरेदी करण्यासही मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सरफेसी ॲक्टनुसार यशवंत सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला […]