गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून वडिलांनी आपल्या चिमुकलीला जोरात दारावर आपटले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तिरोडा तालुक्यातील लोणारा गावात मंगळवारी ही घटना घडली आहे. मुलगी खाऊ खाण्यासाठी हट्ट करत रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पित्याने मुलीला जोरात दारावर आपटले. […]

