A car crashed into a well in Jalna
महाराष्ट्र

ब्रेकिंग : जालन्यात कार विहिरीत कोसळून भीषण अपघात, आईसह चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

जालना : औरंगाबादहून शेगावला जाणारी कार विहिरीत कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात आईसह चार वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीतील इतर 3 जणांना वाचवण्यात यश मिळालं आहे. औरंगाबादहून शेगावला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत विहिरीत कोसळली. […]