जम्मू : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) उपनिरीक्षकाने सोमवारी भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या एका चौकीवर कथितरित्या गोळी झाडून आत्महत्या केली. सकाळी 6.35 च्या सुमारास एक कनिष्ठ सैनिक त्यांच्या खोलीत पोहोचला, तेव्हा रामदेव सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले आणि त्यांच्या बाजूला वैयक्तिक हल्ल्याचे शस्त्र सापडले. रामदेव सिंह हे १२व्या बटालियनचे होते आणि बीएसएफच्या प्लाटूनचे कमांडिंग करत होते. […]

