राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपला औरंगाबादसह पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार […]
टॅग: arun lad
विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधरमध्ये महाविकास आघाडीची सरशी, जाणून घ्या कुठं कोण आहे आघाडीवर
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. नागपूर पदवीधर […]


