Samruddhi Highway will be connected to Vadhvan Port; This highway will become a corridor of prosperity for the state – Chief Minister Devendra Fadnavis
नाशिक महाराष्ट्र

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार; हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण […]

Maharashtra State Scheduled Tribes Commission established, Maharashtra State Scheduled Castes Commission will also function independently
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणे आवश्यक […]

Decision on bush forest boosts Vidarbha's development - Chief Minister Devendra Fadnavis
नागपूर महाराष्ट्र

झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. तो विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा आहे. या निर्णयामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि नागपुरात तर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. ते […]

State's 'parking' policy will be introduced soon - Transport Minister Pratap Sarnaik
महाराष्ट्र मुंबई

वाहनांच्या पार्किंगची समस्या बिकट! राज्याचे ‘पार्किंग’ धोरण लवकरच आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ आणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांनी दिली. […]

Sex Trafficking Racket Busted at Kalyani Nagar Spa in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात स्पा सेंटरच्या आड सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

पुणे : कल्याणी नगरमधील स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कथित सूत्रधार सध्या फरार आहे. येरवडा पोलिस स्टेशन आणि पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या संयुक्त कारवाईत हा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी १६ मे रोजी कल्याणी नगर येथील […]

Seven wagons of goods train derailed at Amalner on Nandurbar-Surat section
जळगाव महाराष्ट्र

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरले

जळगाव : आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. भुसावळहून नंदूरबारकडे निघालेली मालगाडी या स्थानकाजवळील रेल्वे रुळावरून खाली घसरली. या दुर्घटनेत मालगाडीचे सात डब्बे रेल्वे रुळावरून घसरले आणि अस्ताव्यस्त झाले आहेत. दुर्घटना अमळनेर स्थानकापासून अगदी जवळच, प्रसिद्ध प्रताप महाविद्यालयाच्या बाजूला घडली. या दुर्घटनेत लोको पायलट आणि गार्ड […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

पीकविमा योजना ते इलेक्ट्रिक वाहन धोरण, मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ ११ मोठे निर्णय

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील विविध विभागांनी आगामी काळात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जलसंपदा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम, कृषी, परिवहन आणि समाजकल्याण विभागांचे हे निर्णय भविष्यातील धोरणात्मक दिशादर्शक ठरतील. मंत्रिमंडळ बैठकीतील ११ प्रमुख निर्णय 1. टेमघर […]

doctor commits suicide in Solapur, body found in a pool of blood in the bathroom
महाराष्ट्र सोलापूर

सोलापुरात आणखी एका डॉक्टरची आत्महत्या, बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

सोलापूर : सोलापुरात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका डॉक्टराने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे. आदित्य नांबीयार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. तो सध्या सोलापुरात राहत होता, तर मूळचा मुंबईचा असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्यने अलीकडेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते.अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आदित्यने सोलापूर शहरातील डॉ व्ही एम वैशंपायन […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या […]

State government committed to creating an all-round healthy Maharashtra - Deputy Chief Minister Ajit Pawar
पुणे महाराष्ट्र

सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना […]