दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वीजे चित्राने चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ती २८ वर्षांची होती. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं. नैराश्यातून चित्राने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. चित्राचा काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर हे दोघं एकत्रदेखील रहात होते. मात्र, अचानकपणे चित्राने चेन्नईतील नसरपेट […]

