सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीतील जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल चिंता व्यक्त करून महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भवन येथील मिटींग हॉलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुभाष […]
टॅग: सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सोलापूर : आज सकाळी सुमारे ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र सांगोला तालुक्यात जमिनीपासून ५ किमी खाली असल्याचे समजले आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, काहींनी घराच्या बाहेर धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, […]
पुढील 2 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहणार
पुणे : पुणे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील २-३ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारी २ वाजताच्या नवीनतम रडार निरीक्षणानुसार, रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग, नवी मुंबई, रत्नागिरी, पुणे […]
मोठी बातमी! आमदार राम सातपुते यांच्या कारला अपघात, गाडीचे 3 टायर फुटल्याने घडला अपघात
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राम सातपुते यांनीच फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. “मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे. […]
आज ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट
पुणे : राज्यात येत्या पाच दिवसांत तीव्र हवामान सक्रिय राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण किनारपट्टी, अरबी समुद्रावर तसेच मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील […]
दरोडा टाकून वृद्ध व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून वृद्ध व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आतापर्यंत ६ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. याबाबत आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. या दरोडा प्रकरणात गुन्हेगारांचे धागे-दोरे मिळत नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. आता अखेर पोलिसांना या प्रकरणात मोठे यश मिळाले […]
डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारकडून मिळाली फुलब्राईट स्कॉलरशिप
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप मिळाली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील […]
सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे हवे
मुंबई : सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं आणि गौरव वाढवणारं असलं पाहिजे. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. स्मारकाचं काम आकर्षक, दर्जेदार झालं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी […]
‘या’ जिल्ह्यांमध्ये काही वेळात 30-40 किमी प्रतितास तीव्रतेच्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड आणि मुंबई येथे पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास इतक्या तीव्रतेने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर […]
‘या’ जिल्ह्यांत पुढील ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात हाय अलर्ट
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, नाशिक, बीड, परभणी, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात आज पुन्हा हाय अलर्ट असू शकतो. Intense spells of rain […]