नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमधील एका कपड्यांच्या शोरूममध्ये भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास सेंट्रल मार्केटमधील केएफसीजवळ कपड्यांच्या शोरूममध्ये आग लागल्याची घटना घडली. भीषण आग पाहून आसपासच्या लोकांमध्ये […]

