नागपूर : छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. ”जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाहीय. […]
टॅग: उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन
पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील भाजी मंडईच्या नूतनीकरण कामाचे तसेच शास्त्रीनगर चौक येथील उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुनील टिंगरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार […]
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी कोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील किंवा शहरात मध्यवर्ती ठिकाणची अन्य जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत उपकेंद्रासाठी जागेची पाहणी करावी. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जागा अंतिम […]
कोल्हापूरच्या शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरालगतची ५० हेक्टर जागा द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात […]
ब्रेकिंग! अजित पवार यांना कोरोनाची लागण
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन केलं आहे. अजित पवार यांनी ट्विट करत सांगितलं कि, “काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी […]
देहूमध्ये अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, प्रवीण दरेकरांनी केली ‘ही’ विनंती
पुणे : देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, अजित […]
शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकामात शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन पुणे येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनाय विकास आराखड्यास आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे तुळापूर येथील स्मारक आणि वढू […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाकड येथील उद्यानाचे उद्घाटन
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाकड येथील तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे आणि जितेंद्र वाघ, माजी गृह राज्यमंत्री सचिन अहिर, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते. हे संगीत संकल्पनेवरील आधारित महाराष्ट्रातले पहिले उद्यान आहे. यामध्ये रंभा-सांभा, चांम्स्, स्टूल, […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळवडे येथील उद्यानाचे उद्घाटन
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील तळवडे येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या उद्यान व जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली. तळवडे उद्यान अंदाजे १ एकरामध्ये विकसित करण्यात आले असून त्यामध्ये ३०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळण्या, खुली व्यायाम […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मान्यतेने व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्यावतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली. भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाच्या अनुषंगाने व शहरास देशाची […]