मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात एक प्रवासी बस खड्ड्यात पडून मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. ही घटना इंदूरमधील सिमरोल पोलिस स्टेशन हद्दीतील भैरव घाट येथे घडली. इंदूरहून खंडव्याला जाणारी प्रवासी बस अनियंत्रित होऊन 40 फूट खड्ड्यात पडली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही प्रवासी बस इंदूरहून खंडवाकडे जात होती. दरम्यान, भैरव घाटाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या 40 फूट खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
इंदौर के सिमरोल के पास बस दुर्घटना में कई अनमोल जिंदगियों के असामयिक निधन का हृदय विदारक समाचार प्राप्त हुआ। ईश्वर से दिवंगत आत्माओं को अपने श्रीचरणों में स्थान देने एवं घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करता हूं: CM
— CMO Madhya Pradesh (@CMMadhyaPradesh) June 23, 2022




