voting
महाराष्ट्र

राज्यात साडेसात हजार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई : राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुका राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मंगळवारी (२० डिसेंबर) मतमोजणी होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या

अहमदनगर – २०३, अकोला – २६६, अमरावती – २५७, औरंगाबाद – २१९, बीड – ७०४, भंडारा – ३६३, बुलडाणा – २७९, चंद्रपूर – ५९, धुळे – १२८, गडचिरोली – २७, गोंदिया – ३४८, हिंगोली – ६२, जळगाव – १४०, जालना – २६६, कोल्हापूर – ४७५, लातूर – ३५१, नागपूर – २३७, नंदुरबार – १२३, उस्मानाबाद – १६६, पालघर – ६३, परभणी – १२८, पुणे – २२१, रायगड – २४०, रत्नागिरी – २२२, सांगली – ४५२, सातारा – ३१९, सिंधुदुर्ग – ३२५, सोलापूर – १८९, ठाणे – ४२, वर्धा – ११३, वाशीम – २८७, यवतमाळ – १००, नांदेड – १८१ आणि नाशिक – १९६. एकूण – ७,७५१.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत