Sharad Pawar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

ब्रेकिंग! अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवली, रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मोठी घोषणा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व खा. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा फडकावून राष्ट्रवादी काँग्रेस परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यालयील कर्मचारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे हरियाणा आणि पंजाबची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत