bail granted to narayan rane decision by mahad court
महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर सशर्त जामीन मंजूर

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाड सत्र न्यायालयात रात्री पावणे दहा वाजता दाखल करण्यात आले. त्यानंतर कोर्टात राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झाली. कोर्टपरिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या परिसराला छावणीचं रुप आलं होत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे कार्यकर्तेही इथे दाखल झाले होते. पोलिसांकडून ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नारायण राणे यांच्या संदर्भातील दिवसभरातील घडामोडी :

केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या विधानानंतर शिवसैनिक संतप्त झाले तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. शिवसेनेने नारायण राणेंविरोधात आंदोलन केले. नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी बाहेर येण्यास नकार दिला होता.  राणे यांना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. नारायण राणे त्यांच्याच गाडीतून पोलिसांबरोबर रवाना झाले आहेत. निलेश राणे यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता.  त्यानंतर राणेंना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्यानं रायगड पोलिसांकडे त्यांचा ताबा देण्यात आला.  रायगड पोलिसांनी राणेंना महाड कोर्टात हजर केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

काय आहे प्रकरण?

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान औरंगाबादमध्येही शिवसेनेने नारायण राणेंविरोधात आंदोलन केले. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले.

किती वाजता काय घडलं?

10.30: नाशिक पोलीस आयुक्त हा राष्ट्रपती की पंतप्रधान? आमचं पण सरकार वर आहे : नारायण राणे
10.54 : राणे म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान, आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणतात, ते कोर्टात सांगा!
11.30 : तळकोकणातून पहिला हुंकार, नारायण राणेंची रॅली रोखण्याचा इशारा
11.43 : वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेचा एल्गार, राणेंच्या घराबाहेर धुमश्चक्री
12.34 : नाशिक पोलिसांचा प्लॅन बदलला, राणेंना चिपळूणमध्ये अटक करणार नाही
1.31 : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, राणेंच्या वक्तव्याचं समर्थ नाही, पण त्यांच्या पाठी उभं राहण्याचं केलं स्पष्ट
2.04 : राणेंच्या जुहु बंगल्यासमोर युवासैनिक, शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले, चार शिवसैनिक जखमी
2.15 : राणेंना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांकडे वॉरंटच नाही, प्रमोद जठार यांचा दावा
2.21 : नारायण राणे यांना अटक.
3.40 : नारायण राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेलं.
08:36 : नारायण राणे महाड पोलीस ठाण्यात दाखल, न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले.
09:50 : नारायण राणेंना न्यायालयात आणलं.
10:29 : राणेंना 7 दिवसांची पोलीस कोठडी द्या, पोलिसांची मागणी
10:३५ : नितेश राणे कोर्टात उपस्थित, निलमताई राणे यांचे कोर्टात आगमन
10:39 : युक्तीवाद संपला, काही क्षणात दंडाधिकारी जामिनावर निर्णय देणार
10:50 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत