पुणे : थंडी पडण्यास सुरुवात झाली असून हिवाळ्यात सांधे आणि हाडांच्या दुखण्याबद्दल अनेकजण तक्रारी करतात. संधिवात असलेल्या लोकांसाठी तर हा काळ खूप कठीण असतो. तापमानात घट होताच सांधे दुखू लागतात आणि हाडांमध्ये वेदना सुरू होतात. वृद्धांनाही उठताना- बसताना त्रास सहन करावा लागतो. मात्र, थंडीच्या दिवसांत काही उपाय केल्यास ते सांधेदुखीच्या रुग्णांना दिलासा देऊ शकतात.
गरम पाण्याने अंघोळ केल्याने आराम मिळेल
हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने खूप आराम मिळतो. सांधेदुखीच्या रुग्णांनाही गरम पाण्याने मोठा दिलासा मिळतो. यामुळे तुमच्या सांधे आणि स्नायूंना खूप आराम मिळतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या शरीराचे तापमान सामान्य होण्यास वेळ लागतो, त्यामुळे थंडीतून आल्यानंतर लगेचच गरम पाण्याने आंघोळ करण्याची चूक करू नका. शरीराचे तापमान थोडे सामान्य होऊ द्या.
मसाज
किमान आठवड्यातून एकदा मसाज केल्याने वेदना कमी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. मसाज केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
मसाज करण्याचे अद्भुत फायदे! मसाजसाठी ऋतूनुसार आवश्यक तेल आणि मसाजची योग्य पद्दत जाणून घ्या…
व्हिटॅमिन-डी
हिवाळ्यात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे आपले शरीर वेदनांबाबत अधिक संवेदनशील होते. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिसचाही धोका वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात काही काळ सूर्यप्रकाशात जायला हवे. दिवसातून फक्त 15 मिनिटे सूर्यप्रकाश घेतल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन-डी मिळते. यासाठी तुम्ही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मशरूम, फॅटी फिश यांचे सेवन करू शकता.
उबदार कपड्यांचा वापर करा
सांधेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी. आपले संपूर्ण शरीर उबदार कपड्यांनी उबदार ठेवल्याने सांधेदुखी कमी होईल. पायात मोजे घाला. थंडीत अशी खबरदारी घेतल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.
भरपूर पाणी प्या
हिवाळ्यात तहान कमी लागते, परंतु, आपल्या शरीराला नेहमीप्रमाणेच पाण्याची गरज असते. कोणत्याही ऋतूत शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे आपले शरीर अधिक सक्रिय राहते. तुम्ही पाण्याऐवजी ज्यूस, सूप किंवा इतर पेयांनी शरीर हायड्रेट ठेवू शकता.
वजन नियंत्रणात ठेवा
लठ्ठपणा किंवा जास्त वजनामुळे लोक कमी सक्रिय आणि सुस्त होऊ शकतात. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी आपले वजन नेहमी नियंत्रणात ठेवावे. गरज भासल्यास वजन कमी करण्यासही सुरुवात करावी. यासाठी तुम्ही वजन कमी करण्याचे प्रशिक्षण किंवा विशेष आहाराची मदत घेऊ शकता. शरीराच्या वजनाचा संपूर्ण परिणाम आपल्या सांधे आणि हाडांवर पडतो. त्यामुळे त्याबाबत गाफील राहू नका.
निरोगी आहार
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह होतो, परंतु आपला निरोगी आहार विसरू नका. निरोगी आहारामुळे सांधे निरोगी होतात आणि वेदना कमी होण्यास मदत होते आणि लक्षणे सुरू होण्याआधी ती कमी होण्यास मदत मिळते.
सुख म्हणजे नक्की काय असतं? पती-पत्नीच्या नात्यामध्ये ‘या’ गोष्टी असतात खूपच महत्वाच्या
Organ Donation : अवयव दानाबद्दल असलेले गैरसमज आणि त्यामागील सत्य, जाणून घ्या…




