Famous Bollywood playback singer KK alias Krishnakumar Kunnat dies in Kolkata
मनोरंजन महाराष्ट्र

केके यांच्या हृदयाभोवती दिसला पांढऱ्या रंगाचा फॅटी लेयर, शरीरात आढळली 10 विविध औषधे

कोलकाता : गायक केके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. शवविच्छेदन तपासणीत त्यांच्या हृदयाभोवती फॅटी लेयर दिसून आला, जो पांढऱ्या रंगाचा झाला होता आणि हृदय उघडल्यावर झडपाही कडक झाल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस त्यांचे पोस्टमॉर्टम आणि व्हिसेराचे अहवाल हिस्टोपॅथॉलॉजिकल चाचणीसाठी पाठवत आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे ऊतींचा अभ्यास, ज्यामुळे ब्लॉकेजेस दिसून येतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉक्टरांनी सांगितले की हृदयातील कडकपणा ठराविक काळाने विकसित होतो. त्यामुळे, पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा अहवाल हिस्टोपॅथॉलॉजिकल चाचण्यांसाठी पाठवले जातील, ज्यातून ब्लॉकेजेस उघड होऊ शकतात.

केके वारंवार अँटासिडच्या गोळ्या खात असल्याचे समजले. 31 मे रोजी सकाळी त्यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितले होते की त्यांना एनर्जी कमी वाटतेय. त्या रात्री केके यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले होते की त्यांचा खांदा आणि हात दुखत आहे. त्याच्या शरीरात काही आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधांसह गॅस्ट्रिक आणि यकृत आणि व्हिटॅमिन सी यांच्याशी संबंधित 10 विविध औषधे आढळून आली आहेत आणि ऍसिडिटी, छातीत जळजळ आणि गॅसमध्ये त्वरीत आराम देणारी मल्टिपल अँटासिड्स आणि सिरप सापडली आहेत.

दरम्यान, गुरुवारी न्यू मार्केट पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कोलकातास्थित ब्लॅकआयड इव्हेंट हाऊसच्या एका सेलिब्रिटी व्यवस्थापकाची चौकशी केली, ज्याने कार्यक्रमात केकेसाठी गाण्याची व्यवस्था केली होती. केके यांना मंचाच्या ठिकाणाहून हॉटेलमध्ये आणले तेव्हा कारमध्ये केके आणि त्यांचा मॅनेजर हितेश भट्ट यांच्यासोबत ही व्यक्तीदेखील होती. पोलिस कारचा ड्रायव्हर एतवारी यादव याच्याशी देखील बोलले, त्याने पोलिसांना सांगितले की केकेला हॉटेलमध्ये परत येताना अस्वस्थ वाटत होते.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत