पुणे : ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘रिव्होल्यूशन ऑन व्हील’ असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई- पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसारखे अन्य कॉरिडोर करण्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही […]
पुणे
पुणे : ७२ वर्षीय वृद्धावर मुलाच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप; सात वर्षांच्या नातीने तक्रार केल्यानंतर प्रकरण समोर
पुणे : पुण्यातील लोहगावमध्ये एका ७२ वर्षीय वृद्धाविरुद्ध बाल लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर मुलांना अश्लील सामग्री दाखवणे आणि त्यांच्याशी अनुचित वर्तन करण्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती सात वर्षांच्या नातीने आपल्या पालकांना दिल्यानंतर कळली. नातीनं आपल्या पालकांना सांगितलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करत पालकांनी विमान नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार […]
पुण्यातील एनडीएमध्ये १८ वर्षीय कॅडेटचा मृतदेह आढळला, पोलिसांना आत्महत्येचा संशय
पुणे : शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा मृतदेह त्याच्या वसतिगृहातील खोलीत आढळला. पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार ही घटना आत्महत्येची असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. मृत कॅडेटची ओळख अंतरिक्ष कुमार सिंग अशी पटली असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी होता. अंतरिक्ष हा माजी सैनिकाचा मुलगा असून एनडीएमधील चार्ली स्क्वॉड्रनचा पहिल्या टर्मचा […]
‘गौतमी पाटीलच्या वक्तव्यांमध्ये कमालीची विसंगती’, रिक्षाचालक मरगळे यांच्या मुलीने घेतला चांगलाच समाचार
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने झालेल्या अपघातानंतर आता या प्रकरणात नवा वाद उफाळला आहे. या अपघातात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आयसीयूतून बाहेर आले असून तब्येत स्थिर असल्याचे समजते. मात्र, या अपघातानंतर गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंब यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला […]
पुण्यात ९ ऑक्टोबर रोजी ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) नव्याने स्थापन झालेल्या पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पातील (५०० एमएलडी) आवश्यक कामांसाठी गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या काळात रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद : पर्वती पंपिंग स्टेशन परिसर, पार्वती एलिव्हेटेड जलाशय परिसर आणि पर्वती ईएसआर टाकी […]
पुणे : गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक, ८० हजाराचा मुद्देमाल जप्त
पुणे : वानवडी परिसरात पोलीसांनी गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. वानवडी भागातील गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगर रस्ता ह्या भागात वानवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी विठ्ठल चोरमोले आणि अमोल गायकवाड गस्त घालत होते. या दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की तौफिक रझाक शेख (वय २६, रा. नवाजीश चौकाजवळ, मीठानगर, कोंढवा खुर्द) दुचाकीवरून […]
पुणे विमानतळावर महिलेकडे आढळली विनापरवाना पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे, महिला पोलिसांच्या ताब्यात
पुणे : इंदूरमार्गे दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानात चढताना एका महिला प्रवाशाकडे विनापरवाना पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळल्याने पुणे विमानतळावर खळबळ उडाली. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे राहणारी व बारामती येथे तांत्रिक शिक्षण घेणारी सेविका वैशाली वैभव दोशी (४४) हिला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन दिवसांत विमानतळावर घडलेली ही दुसरी घटना आहे. पोलिस उपायुक्त […]
पुणे : वीज आणि आधुनिक सुविधा न वापरणाऱ्या ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन
पुणे : वनस्पतींच्या विश्वकोश आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ व शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. त्या १९६० पासून वीज आणि आधुनिक सुविधा न वापरत, साध्या जीवनशैलीत राहात होत्या. त्यांनी आजच्या आधुनिक युगात पर्यावरणपूरक जीवनाचा आदर्श निर्माण केला. डॉ. साने यांनी एम.एससी. आणि पीएच.डी. वनस्पतीशास्त्रात केली आणि पुण्यातील आबासाहेब […]
शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम असलेल्या जिल्ह्यांना मिळणार ५, ३ व २ कोटींची पारितोषिके
पुणे : राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास ५ कोटी, द्वितीय क्रमांकास ३ कोटी आणि तृतीय क्रमांकास २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज पुण्यात केली. बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे आयोजित दोन दिवसीय […]
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
पुणे : गुरुवारी पहाटे, काही मित्रांची एक मजेदार सहल दुःखद घटनेत बदलली, जेव्हा पुणे-मुंबई महामार्गावर अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील देहू रोडजवळील ईदगाह मैदानाजवळ सकाळी सुमारे ५:४५ वाजता ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी कार लोणावळा येथील हिल स्टेशनची सहल पूर्ण करून पुण्याकडे परतत असताना एका उभ्या कंटेनर ट्रकला […]