छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ व मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. यांच्या मार्फत जिल्ह्यातील 15 वितरण केंद्रांवर होत असलेल्या गृहपयोगी संचाच्या वाटपाबाबतच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात त्यांनी हे वितरण पूर्णतः निःशुल्क असून कुणाकडून पैशांची मागणी केल्यास तात्काळ पोलिसांत तक्रार द्यावी असे आवाहन त्यांनी […]
छत्रपती संभाजी नगर
Stay updated with the latest news and developments related to Chhatrapati Sambhaji Nagar (formerly Aurangabad). This section covers everything from the city’s renaming journey to cultural, political, and social updates. Get detailed insights on local events, government decisions, community activities, and other important happenings in the city. Stay informed about the transformation and progress of Chhatrapati Sambhaji Nagar through timely news reports and announcements.
छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा देता येईल अशी योजना पूर्णत्वाकडे जात आहे. २६ द.ल.ली. हा या योजनेतील एक टप्पा आहे. उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करून शहराला ३६५ दिवस २४X७ शाश्वत पाणीपुरवठा करता होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त […]
पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, नियोजन विभागाचे उपायुक्त विजय पवार, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे नियोजन अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त पापळकर […]
प्रियकराकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : भीमनगर येथील १९ वर्षीय प्रारंभी दीपक इंगळे या तरुणीने तिच्या प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १९ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. छावणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सचिन राजू भिसे (वय १९, रा. मिल कॉर्नर) याला अटक केली […]
बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याचे निलंबन – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाच्या पूर्वीच १४७ लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीअंती संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांचे निलंबन करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी पुढील दोन महिन्यात करण्यात येणार असून […]
अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान
छत्रपती संभाजीनगर : लग्नसराई सुरु आहे. अवतीभवती अनेक लग्न होत आहेत. त्यात ही आणखी ‘एका लग्नाची गोष्ट’…पण जराशी वेगळी! शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहात राहणाऱ्या अनाथ पुजाचे आज अण्णासाहेब सातपुते या युवकाशी लग्न झाले. शासनाच्या अनाथाश्रमातली ही कन्या आज सातपुतेंच्या घरची सून झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः या मुलीचे पालक म्हणून कन्यादान केले. एरवी रुक्ष […]
शरीरसुखाला नकार दिल्याने १९ वर्षीय मुलाचा राग अनावर, ३६ वर्षीय महिलेसोबत भयंकर कृत्य
छत्रपती संभाजीनगर : शरीरसुखाला नकार दिल्याने एका १९ वर्षीय मुलाने भावकीतल्याच ३६ वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पीडितेला तब्बल २८० टाके पडले आहेत. याप्रकरणी १९ वर्षीय हल्लेखोर अभिषेक नवपुते याला पोलिसांनी अटक केली आहे. शरीरसुखाला नकार दिल्याने १९ वर्षांच्या […]
मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका): मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही जबाबदारी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे पार पाडावयाची असून ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे दि.१२ रोजी सज्ज असायला हवी, यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी […]
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती देण्यात यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) औरंगाबाद महानगरपालिका स्तरावरील कामासंदर्भात आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री अतुल सावे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, नगरविकास […]
औरंगाबादमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी
औरंगाबाद : औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील कायगावजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. कायगाव येथे स्विफ्ट आणि वॅगन आर कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कायगाव येथे स्विफ्ट आणि वॅगन आरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. […]