शिर्डी : अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत करावे. प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबित असलेल्या रस्त्यांबाबत पाणी ओसरल्यानंतर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. पालकमंत्री विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता तालुक्यातील पिंप्रिनिर्मळ, अस्तगाव, एकरूखे, चितळी व पिंपळवाडी या गावांना भेटी देऊन पूरग्रस्त शेतीपिकांची […]
अहिल्यानगर
Stay updated with the latest news and developments from अहिल्यानगर (Ahilyanagar) and the surrounding Malwa region. From local events and political updates to cultural stories and community happenings, this section brings you everything you need to know about life in this historic and vibrant region.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका
अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात करण्यात आले होते. या पथकाने आज राबविलेल्या मोहिमेत पुरात अडकलेल्या ४४ नागरिकांची सुरक्षित सुटका केली. कमांडंट संतोष बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात पाणी व चिखलमय स्थिती तसेच ऊसशेतीमुळे बोटसह बोटीवरील […]
जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी काम करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी : महसूल हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित विभाग आहे. महसुली अधिकारी – कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने काम करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता येथे महसूल विभागातर्फे आयोजित ‘महसूल सप्ताह – २०२५’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी […]
ऊस संशोधनात नवे पाऊल : विखे पाटील फाउंडेशन व डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये सामंजस्य करार
अहिल्यानगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषि महाविद्यालय, अहिल्यानगर आणि डी. वाय. पाटील कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे (कोल्हापूर) यांच्यात आधुनिक ऊस रोपे उत्पादन व कृषि संशोधन केंद्र स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार बुधवारी (३० जुलै) अहिल्यानगर येथे झाला. या करारानुसार, दोन्ही संस्था संशोधन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व शिबिरे यांच्या माध्यमातून ऊस लागवडीतील […]
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला रुग्णांसाठी जीवनदायी !
अहिल्यानगर : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आशेचा नवा किरण ठरला आहे. गेल्या पाच महिन्यांत या निधीच्या माध्यमातून जवळपास ४ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य रुग्णांना देण्यात आले असून उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे २०२५ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
संगमनेरातील कत्तलखाने व अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष – आमदार खताळ यांचा सभागृहात आरोप
अहिल्यानगर : संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने व इतर गुन्हेगारी कारवायांबाबत स्थानिक पोलिस अधिकारी शासनाला खोटी माहिती देत असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळात केला आहे. विधिमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना आमदार खताळ यांनी सांगितले की, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यातील कारवाई बाबत चुकीची व दिशाभूल करणारी […]
अहिल्यानगरातील ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ ११ महत्त्वपूर्ण निर्णय
अहिल्यानगर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऐतिहासिक बैठकीत विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण विषयक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्थळाच्या जतनासाठी ६८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन […]
डिजिटल शिक्षणाचे धोरण स्वीकारणे काळाची गरज – प्रा. राम शिंदे
अहिल्यानगर : आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये डिजिटल शिक्षण आवश्यक असून डिजिटल शिक्षण धोरण स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. ‘डिजिटल स्कूल’ या संकल्पनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील ८७ व जामखेड तालुक्यातील २४ अशा १११ शाळेतील इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचे लोकार्पण सभापती […]
शिर्डी विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना सुरुवात
मुंबई : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ही ऐतिहासिक सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि संबंधित नियामक संस्थांच्या प्रयत्नांमुळे शिर्डीतील हवाई वाहतूक सेवा नव्या उंचीवर पोहोचली आहे. या नव्या टप्प्याचा लाभ यात्रेकरूंना तसेच पर्यटकांना होणार असून, […]