Heavy Rain in Maharashtra: Government Approves Immediate Relief Fund for Flood-Affected Farmers and Citizens
महाराष्ट्र मुंबई शेती

मोठी बातमी! पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी निधी मंजूर, राज्य सरकारचे जिल्हा प्रशासनाला तातडीचे आदेश

मुंबई : राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा परिषदा आणि जिल्हा नियोजन समित्यांना तातडीचे आदेश दिले आहेत. आपत्तीग्रस्तांना मदत लवकर मिळावी यासाठी वार्षिक जिल्हा योजनेतून थेट ५ टक्क्यांपर्यंत निधी वापरण्याची परवानगी शासनाने दिली आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आपत्कालीन उपाययोजना तत्काळ राबवू शकणार आहे. शासन […]

Chandrakant Patil inspecting flood-affected areas and reviewing relief measures in Sangli, 2025
महाराष्ट्र शेती

पूरबाधितांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 23 : पूरस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन ठामपणे उभे आहे. त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, शेतातील पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पालकमंत्र्यांनी शनिवारी वाळवा तालुक्यातील जुने खेड, औदुंबर येथील दत्तमंदिर परिसर, मौलानानगर, पलूस तालुक्यातील भिलवडी […]

Measures to prevent the outbreak of flower bugs, bollworms and humani worms, important advice from the Agriculture Department
महाराष्ट्र शेती

फुलकीडे, बोंड अळी व हुमणी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना : कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

राज्यासह नागपूर विभागात समाधानकारक पाऊस झाला व पेरणीही पूर्णपणे झालेली आहे. शेतात पीक डौलाने उभी राहत असून त्यांची वाढ व निकोपतेसाठी शेतकऱ्यांना कसोशीने लक्ष द्यावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांच्या वाढीबरोबरच कीड व अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या शेतकऱ्यांना नियोजनही करावे लागणार आहे. कापूस पिकावर होणारा फुलकीडे व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव तसेच सोयाबीन, तूर व कापूस […]

farmers
महाराष्ट्र शेती

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या, मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय

मुंबई : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवा. गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी, असे […]

Central government extends deadline for tur procurement
महाराष्ट्र मुंबई शेती

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! तूर खरेदीला केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी […]

Provide loans to farmers without making CIBIL score a condition – Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई शेती

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न घालता कर्ज पुरवठा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका. बँकांना यापूर्वीही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापूर्वी यासंदर्भात निर्देश न जुमानणाऱ्या बँकावर ‘एफआयआर’ देखील दाखल केले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बँक शाखा सिबिल स्कोअर मागत असेल […]

Manikrao Kokate's Controversial Statement on Onion Prices
महाराष्ट्र मुंबई शेती

कांद्याचे दर पडायला शेतकरीच जबाबदार, कृषीमंत्र्यांचं शेतकऱ्यांच्या वेदनांवर मीठ चोळणारं वक्तव्य

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कांद्याचे बाजारभाव पडण्याबाबत भाष्य करताना त्यांनी शेतकऱ्यांनाच यासाठी जबाबदार धरले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, “एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, […]

Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र शेती

विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी शासनाचे पाठबळ

मुंबई : सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून उत्तम पर्याय समोर येत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची अंमलबाजवणी करीत आहे. […]

Environment Minister Pankaja Munde discusses the benefits of agricultural electric vehicles for farmers, highlighting the significant changes in the state's electric vehicle policy.
महाराष्ट्र मुंबई शेती

मोठी बातमी! राज्य शासनाकडून इलेक्ट्रिक वाहन धोरणात महत्त्वपूर्ण बदल, शेतकऱ्यांना होतील ‘हे’ फायदे

मुंबई : राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा […]

Dr. Sujay Vikhe Patil inaugurating the newly opened stalls for flowers, garlands, and offerings at Shirdi Sai Baba Temple, marking the resumption of sales for devotees and farmers.
अहिल्यानगर महाराष्ट्र शेती

साई भक्तांसाठी आनंदाची बातमी – शिर्डी साई मंदिरात हार, फुले आणि प्रसाद विक्रीला परवानगी

शिर्डी – उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार, फुले आणि प्रसाद विक्रीला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. राहाता तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षे फुले विक्रीसाठी लढा दिला होता, आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. फुलशेती हे या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. परंतु, साई मंदिरात फुले आणि हार विक्रीवर घालण्यात […]