Tirath Singh Rawat to become new chief minister of Uttarakhand
देश

ब्रेकिंग : तीरथसिंग रावत होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

देहरादून : तीरथसिंग रावत आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नावावर भाजप विधिमंडळातील सर्व आमदारांनी शिक्कामोर्तब केले. तीरथसिंग रावत मुख्यमंत्रीपदाची शपथ आज (बुधवार) संध्याकाळी घेतील अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीत सर्व खासदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. तत्पूर्वी मंगळवारी त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तीरथसिंग रावत उत्तराखंडच्या गढवाल लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. ते उत्तराखंड भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत, आता ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत.

कोण आहेत तीरथसिंग रावत ?

तीरथसिंग रावत 9 फेब्रुवारी 2013 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत उत्तराखंड भाजपचे प्रमुख राहिले आहेत. यापूर्वी ते २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत चौबतखल येथून जिंकले होते. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. यापूर्वी ते उत्तर प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्षही होते. ते 1997 मध्ये उत्तर प्रदेशचे आमदार देखील होते. ते उत्तराखंडचे पहिले शिक्षणमंत्री राहिले आहेत. सध्या ते पौड़ी लोकसभेचे खासदार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत