Recognition of SNDT University as an independent incubation center to promote women entrepreneurship
काम-धंदा महाराष्ट्र

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘या’ विद्यापीठाला स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई : राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने SNDT महिला विद्यापीठाला (एसएनडीटी विद्यापीठ) महिलांकरिता एक स्वतंत्र इन्क्युबेशन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एसएनडीटी हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ असून महाराष्ट्रातील एकमेव शासकीय महिला विद्यापीठ आहे. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मार्गदर्शन करणे, अर्थसहाय्य करणे, विकसित स्टार्टअप्सना अधिकृत निधीकरिता स्टार्टअप परिसंस्थेतील गुंतवणूकदारांशी समन्वय साधून देणे, संशोधन व विकास क्षेत्रात तसेच तांत्रिक उद्योजकता क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या महिलांना विशेष अनुदान पुरविणे, विकसित स्टार्टअप्सच्या विस्तृतीकरणासाठी व त्यांच्या उद्योगास चालना देण्यासाठी विविध एक्सलरेटर कार्यक्रम राबविणे इत्यादीकरिता हे इन्क्युबेशन सेंटर काम करेल. या उपक्रमाने महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल व देशात महाराष्ट्र एक उदाहरण प्रस्थापित करेल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये नुकताच स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. सोसायटीमार्फत उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह, महाराष्ट्र स्टार्टअप आणि इनोव्हेशन यात्रा, नवउद्योजकांना पेटंट मिळविण्यासाठी तसेच गुणवत्ता परीक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. आता यापुढे या सर्व उपक्रमांमध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असं मलिक म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत