पुणे : पुण्यातील वारजेमध्ये विचित्र अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील वारजेमध्ये १० वाहने एकमेकांना धडकली आहेत. या विचित्र अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंबई-बेंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील वारजेजवळील हैदराबाद बिर्याणीसमोर दहा वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. परंतु या विचित्र अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.




