Two cars collide head-on in Aurangabad, 4 people died
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी

औरंगाबाद : औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील कायगावजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. कायगाव येथे स्विफ्ट आणि वॅगन आर कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, कायगाव येथे स्विफ्ट आणि वॅगन आरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत, पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनांतून जखमींना बाहेर काढण्यात आलं. पाच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मृतांची नावे :

  1. रतन शांतीलाल बेडवाल (वय ३८)
  2. सुधीर पाटील (५०)
  3. रावसाहेब मोठे (५०)
  4. भाऊसिंग गिरासे (४५)

जखमींची नावे :

  1. शशीकला भाऊराव कोराट (७०)
  2. सिद्धार्थ जंगले (१४)
  3. हेमंत जंगले (५५), छाया हेमंत जंगले (३५)
  4. कुंतला दिगंबरराव जंगले (७०)
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत