मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसींच्या खरेदीसाठी 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोफत लसी पुरवण्याची घोषणा केली. लसीकरणाचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यांवर असणारा भार कमी झाला आहे. त्यामुळे आता ते 7 हजार कोटी रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना द्यावे, असे मत माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले आहे.
माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लशीकरिता 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मोफत लशी देऊन तो भार कमी केला आहे. त्यामुळे ते 7 हजार कोटी शेतकऱ्यांना देण्यात यावे.”
महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी लशीकरिता 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता परंतु स. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मोफत लशी देऊन तो भार कमी केला आहे. त्यामुळे ते 7 हजार कोटी शेतकऱ्यांना देण्यात यावे. @BJP4India @BJP4Maharashtra @narendramodi @OfficeofUT
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) June 12, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे, केल्या ‘या’ मोठ्या घोषणा




