मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना राज्यात सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्याच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र संकटाशी संबंधित इतर प्रकरणांसह या प्रकरणावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने […]

