nikita vibhuti dhoundiyal joins indian army
देश

सलाम! शहीद मेजर विभूती धौंडियाल यांची पत्नी भारतीय सैन्यात दाखल, आजपासून ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी नितिका कौल आज भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’ बनल्या आहेत. नितीका यांनी आज भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून हुतात्मा मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली. मेजर विभूती फेब्रुवारी 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले […]

Police Commemoration Day
देश

पोलीस स्मृती दिन : करोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचारी शहिद

गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त दिल्लीतील ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’वर श्रद्धांजली अर्पण केली. करोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती यावेळी  अमित शहा यांनी दिली आहे. आत्तापर्यंत एकूण ३५ हजार ३९८ पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहेत. हे स्मारक केवळ विटा, दगड आणि सिमेंटनं बनलेलं स्मारक नाही तर हे स्मारक […]

देश

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ सीआरपीएफ जवान व १ एसपीओ शहीद

सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली. केंद्रीय राखीव पोलीस बलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) हे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. गोळीबारात काही सुरक्षा रक्षकांना गंभीर इजा झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. […]