देश

पत्नीने प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्यामुळे पतीने गमावले पुरुषत्व, त्यानंतर उचलले टोकाचे पाऊल…

राजस्थान : प्रतापगडमधील तरुणाने त्याच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण नमूद केले आहे. धामोतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारी टापरा गावात सोमवारी दुपारी शेर सिंग (२२) नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांचे म्हणणे आहे की याआधी शेर सिंगने एक सुसाईड नोट लिहून त्यात सांगितले होते की, त्याच्या पत्नीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली होती, ज्यामुळे त्याने आपले पुरुषत्व गमावले होते. यामुळे तो आत्महत्या करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी शेरसिंग त्याच्या पत्नीला मोहरी सोडण्यासाठी गेला होता. तिला सोडून परत आल्यावर त्याने आत्महत्या केली. नातेवाइकांनी दरवाजा ठोठावला असता शेर सिंग याने दरवाजा उघडला नाही. यानंतर नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने टेरेसवरून जाऊन दरवाजा उघडला. यावेळी त्यांना शेर सिंग गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. नातेवाइकांनी त्याला तात्काळ खाली उतरवून रुग्णालयात नेले. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी धामोतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एसएचओ मुन्शी मोहम्मद पठाण यांनी सांगितले की, सुसाईड नोटच्या आधारे या प्रकरणाचा तपास केला जाईल. सायंकाळी पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेर सिंगचे दोन वर्षांपूर्वी रीनाशी लग्न झाले होते. लग्नानंतर या दोघांमध्ये नेहमी भांडण होत असायचे. त्यांना मूलबाळ नव्हते. पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करून घेतला असून तपास सुरू केला आहे.

भयंकर! नवजात बाळाचे डोके तुटून आईच्या पोटातच राहिले, पाकिस्तानमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा

सांगली हादरली! एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्या केल्याची माहिती

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

7 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago