महाराष्ट्र

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

तसेच केंद्र सरकारसोबतही समन्वय ठेवून आवश्यक ती मदत व सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संबंधित दूतावास, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि इतर यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना या संपूर्ण समन्वय कार्यात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारकडूनही महाराष्ट्र शासनाला सर्वतोपरी मदत केली जात असून अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.

दुबईतील इंडियन पीपल्स फोरम यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाने मदतीसाठी एक विशेष व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे. आखाती देशांमध्ये अडचणीत असलेल्या किंवा मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांनी व्हॉटसॲप क्रमांकाद्वारे : +97150 365 4357 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago