महाराष्ट्र

सांगली हादरली! एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्या केल्याची माहिती

सांगली : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील नऊ सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले. सुरुवातीला या सगळ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, हे कुटुंब आर्थिक कारणांमुळे तणावत होते. त्यामुळेच या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे हा भयंकर प्रकार घडला आहे.

मिरज येथील शासकीय रुग्णालयात या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. म्हैसाळ येथील डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या कुटुंबातील आठ ते नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आक्काताई वनमोरे, डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, रेखा माणिक वनमोरे, प्रतिमा वनमोरे, आदित्य वनमोरे आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना पोपट वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, शुभम पोपट वनमोरे यांचा समावेश आहे.

सांगलीचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, आम्हाला एका घरात नऊ मृतदेह सापडले आहेत. एका ठिकाणी तीन मृतदेह सापडले आहेत, तर सहा घरात इतर वेगवेगळ्या ठिकाणी सापडले आहेत. या कुटुंबाचे म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिकानगरमध्ये एक तर राजधानी कॉर्नर येथे दुसरे घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एका घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह आढळले. त्यानंतर एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह त्यांची आई, पत्नी आणि मुलांचा यात समावेश आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago