Pune Toxic Liquor Case Investigation
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. या दुर्घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करा आणि अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आतापर्यंत या प्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्तपणे तपास सुरू असून, या विषारी दारूचा पुरवठा कोठून झाला आणि यात कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…