मनोरंजन

अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची गळफास घेऊन आत्महत्या, मनोरंजनविश्वात खळबळ

Rashmirekha Ojha Suicide : आणखी एक प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रश्मिरेखा ओझाबद्दल धक्कादायक बातमी येत आहे. रश्मिरेखाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रश्मिरेखा यांचा मृतदेह त्यांच्या नयापल्ली भागातील भाड्याच्या घरात आढळून आला. मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, ती या घरात तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत होती. पोलिसांना रश्मिरेखाची सुसाईड नोटही सापडली असून त्यात आत्महत्येचे कारण सांगितले आहे. मात्र, रश्मिरेखाच्या कुटुंबीयांना वेगळाच संशय आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे?

या प्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 23 वर्षीय अभिनेत्री 18 जूनच्या रात्री तिच्या भाड्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. अभिनेत्रीने एक चिठ्ठी सोडली आहे, ज्यामध्ये तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही असे नमूद केले आहे. अभिनेत्रीने सुसाईड नोटमध्ये काम न मिळाल्याचे देखील लिहिले होते. मात्र, रश्मिरेखा यांच्या कुटुंबीयांना हे प्रकरण वेगळेच वाटत आहे.

कुटुंबीयांना वेगळाच संशय
आपल्या मुलीच्या मृत्यूमध्ये तिचा लिव्ह-इन पार्टनर संतोष पात्रा याची भूमिका असल्याचा आरोप अभिनेत्रीच्या वडिलांनी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वडिलांचे म्हणणे आहे की त्यांना मुलीच्या लिव्ह-इन पार्टनरबद्दल माहिती नव्हती, परंतु त्यांना घरमालकाकडून कळले आहे की ती संतोष पात्रा नावाच्या मुलासोबत लिव्ह-इनमध्ये होती.

जगतसिंगपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेली रश्मिरेखा ओझा ‘केमिती कहीबी कहा’ या टीव्ही मालिकेत दिसली आहे. अशा अनेक शोमध्ये आपल्या दमदार अभिनयाने तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

7 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago